IBPS लिपिक मुख्य परीक्षा प्रवेशपत्र 2025 (CRP-XV) जाहीर!
बँकिंग कार्मिक निवड संस्थेने (IBPS) लिपिक पदांच्या मुख्य परीक्षेसाठी (CRP CSA-XV) प्रवेशपत्र त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे. ज्या उमेदवारांनी पूर्व परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे, ते आता मुख्य परीक्षेसाठी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही भरती प्रक्रिया ऑफिस असिस्टंट (Multipurpose), ऑफिसर स्केल-I (Assistant Manager), ऑफिसर स्केल-II (Manager), आणि ऑफिसर स्केल-III (Senior Manager) या पदांसाठी आहे.
IBPS लिपिक भरती 2025: महत्त्वाच्या तारखा
IBPS लिपिक भरती 2025 (CRP CSA-XV) शी संबंधित महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत. मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र 2 डिसेंबर 2025 पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध असेल.
| परीक्षा टप्पा | तारीख |
|---|---|
| पूर्व परीक्षा | 04 & 05 ऑक्टोबर 2025 |
| मुख्य परीक्षा | 02 डिसेंबर 2025 |
| मुख्य परीक्षा प्रवेशपत्र | 24 नोव्हेंबर 2025 पासून उपलब्ध |
प्रवेशपत्र डाउनलोड कसे करावे?
उमेदवार आपले मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) खालील सोप्या पायऱ्या वापरून डाउनलोड करू शकतात:
- सर्वप्रथम IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: ibps.in
- मुख्यपृष्ठावर 'CRP Clerical' किंवा 'CRP-CSA-XV' या लिंकवर क्लिक करा.
- आता "Online Main Exam Call Letter for CRP-CSA-XV" या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख (Date of Birth) टाका.
- लॉगिन केल्यानंतर, तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
- प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.
प्रवेशपत्रावरील तपशील
उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर त्यावरील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी. प्रवेशपत्रावर खालील माहिती असेल:
- उमेदवाराचे नाव
- नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर
- परीक्षेची तारीख आणि वेळ
- परीक्षा केंद्राचा पत्ता
- रिपोर्टिंगची वेळ
- परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या सूचना
IBPS Admit Card: IBPS परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करा
इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने अलीकडेच विविध पदांसाठी CRP RRB VIII भरतीसाठी पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे, ते उमेदवार आपले प्रवेशपत्र अधिकृत लिंकवरून डाऊनलोड करू शकतात. IBPS मार्फत ऑफिस असिस्टंट (मल्टिपर्पज), ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर), ऑफिसर स्केल-II (मॅनेजर), आणि ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) पदांसाठी मेगा भरती होत आहे.
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.