Color Posts

Type Here to Get Search Results !

ADIVASI VIKAS VIBHAG Bharti 2023 | आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट शाषन 602 पदांसाठी अर्ज सुरु

0

Information Colleceted By | mahaenokari | Mahanokri | MahaNokari | MahaNaukari 

आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट शाषन  602 पदांसाठी अर्ज सुरु- ADIVASI VIKAS VIBHAG Bharti

(ADIVASI VIKAS VIBHAG Bharti) आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट शाषन  602 पदांसाठी अर्ज सुरु

ADIVASI VIKAS VIBHAG: आदिवासी विकास भवन, पहिला माळा, गडकरी चौक, जूना आग्रा रोड, नाशिक दूरध्वनी क्र. 0253-2575615, 2317938, फॅक्स क्र. 2579208ई-मेल:admnetd.nsk-mh@gov.inवेबसाइट: https://tribal.maharashtra.gov.in सरळसेवा भरती – २०२३ गट (ब) अराजपत्रित संवर्ग व गट क संवर्ग आदिवासी विकास विभागांतर्गत आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अधिपत्याखालील तसेच नियुक्ती प्राधिकारी अपर आयुक्त, नाशिक/ठाणे/अमरावती/नागपूर यांच्या आस्थापनेवरील गट (ब) अराजपत्रित व गट क संवर्गातील सरळसेवा कोटयातील विविध

 

ADIVASI VIKAS VIBHAG   नोकरी जाहिरात 2023

ADIVASI VIKAS VIBHAG: संवर्गातील ६०२ पदांच्या सरळसेवा भरतीकरीता पात्र उमेदवारांकडून विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक २३.११.२०२३ ते १३.१२.२०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परिक्षा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.

ADIVASI VIKAS VIBHAG नोकरी जाहिरात 2023 – थोडक्यात माहिती

कार्यालयाचे  नाव- आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट शासन

पदाचे नाव- उच्च श्रेणी लघुलेखक,निम्म श्रेणी लघुलेखक,वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक,उपलेखापाल/मुख्य लिपिक,वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक,लघुटंकलेखक,गृहपाल (पुरुष),गृहपाल (स्त्री),अधीक्षक (पुरुष),अधीक्षक (स्त्री),ग्रंथपाल,प्रयोगशाळा सहाय्यक,आदिवासी विकास निरीक्षक,सहाय्यक ग्रंथपाल,प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम),माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम),उच्च माध्यमिक शिक्षणसेवक, प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)

जाहिरात क्रमांक- आस्था- पद भरती-२०२२/प्र.क्र. १४२/का. २(१)/ नाशिक दिनांक: २३/११/२०२३

रिक्त पदांची संख्या- 602

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख- 23 नोव्हेंबर 2023

ऑनलाईन अर्ज बंद होण्याची तारीख- 13 डिसेंबर 2023

शिक्षण- पदवी

वयाची पात्रता- वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे इतकी आहे.

अर्ज करण्याची पद्धत- अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

नोकरीची श्रेणी- राज्य शासनाच्या अधिवासी विकास विभागाच्या नोकऱ्या

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

नोकरीसाठी निवड प्रक्रिया- कॉम्पुटर बेस परीक्षा (सरळसेवा)

अधिकृत संकेतस्थळ- https://tribal.maharashtra.gov.in

 


ADIVASI VIKAS VIBHAG  रिक्त जागा 2023

1          वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक निरिक्षक 14

2          संशोधन सहाय्यक 17

3         उपलेखापाल/मुख्य लिपिक         41

4         आदिवासी विकास निरीक्षक        14

5         वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक     187

6         लघुटंकलेखक         05

7          अधीक्षक (पुरुष)    26

8         अधीक्षक (स्त्री)       48

9         गृहपाल (पुरुष)      43

10       गृहपाल (स्त्री)         25

11         ग्रंथपाल        38

12        सहाय्यक ग्रंथपाल  01

13        प्रयोगशाळा सहाय्यक       29

14       उच्च माध्यमिक शिक्षण सेवक     14

15       माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)     15

16        प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)       27

17        प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम)        48

18       उच्चश्रेणी लघुलेखक           03

19        निम्नश्रेणी लघुलेखक       13

एकूण जागा 602

ADIVASI VIKAS VIBHAG  नोकऱ्या 2023 – शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक निरिक्षक:

कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी

संशोधन सहाय्यक: पदवीधर

उपलेखापाल/मुख्य लिपिक: पदवीधर

आदिवासी विकास निरीक्षक: पदवीधर

वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक: पदवीधर

लघुटंकलेखक: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

अधीक्षक (पुरुष): समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी

अधीक्षक (स्त्री): समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी

गृहपाल (पुरुष):समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी

गृहपाल (स्त्री): समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी

ग्रंथपाल: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र

सहाय्यक ग्रंथपाल: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र

प्रयोगशाळा सहाय्यक: 10वी उत्तीर्ण

उच्च माध्यमिक शिक्षण सेवक: (i) द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed

माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम): (i) पदवीधर  (ii) B.Ed

प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम): (i) 10वी/12वी उत्तीर्ण  (ii) D.Ed   (iii) TET/CTET

प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम): (i) इ.1 ते 12 वी शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक  (ii) TET/CTET

उच्चश्रेणी लघुलेखक: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv)CCC किंवा   MS-CIT

निम्नश्रेणी लघुलेखक: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) CCC किंवा  MS-CIT

ADIVASI VIKAS VIBHAG – वयोमर्यादा

01 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे 

मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

ADIVASI VIKAS VIBHAG पगार

  • निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत रु. 18,500/- pm
  • नियमितीकरणावरील मूळ वेतन रु.21500/- रु.21500-3%-74000/-

ADIVASI VIKAS VIBHAG अर्ज शुल्क

राखीव प्रवर्गासाठी (SC/ST/PWD) 900/- रुपये तर

इतर सर्वांसाठी 1000/- रुपये शुल्क भरणे अनिवार्य आहे.

ADIVASI VIKAS VIBHAG ऑनलाइन फॉर्म लिंक

ADIVASI VIKAS VIBHAG  महत्त्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट – वर जा !

ADIVASI VIKAS VIBHAG  अधिसूचना  PDF डाउनलोड करण्यासाठी- सूचना तपासा

ADIVASI VIKAS VIBHAG  अर्ज करण्यासाठी- लिंक लागू करा

 

ADIVASI VIKAS VIBHAG – FAQ

ADIVASI VIKAS VIBHAG  नोकऱ्या 2023 साठी अर्ज शुल्क किती आहे?

राखीव प्रवर्गासाठी (SC/ST/PWD) 900/- रुपये तर

इतर सर्वांसाठी 1000/- रुपये शुल्क भरणे अनिवार्य आहे..

ADIVASI VIKAS VIBHAG च्या 2023  किती जागा उपलब्ध आहेत?

एकूण जागा 602

ADIVASI VIKAS VIBHAG  अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा किती आहे?

01 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे 

मागासवर्गीय: 05वर्षेसूट

ADIVASI VIKAS VIBHAG जॉब्स नोटिफिकेशन 2023 च्या अधिक अपडेट्ससाठी mahaenokari.com आमच्या वेबसाइटला फॉलो करा  . 

  

 ADIVASI VIKAS VIBHAG  अधिकृत जाहिरात PDF जशीच्या तशी

जाहिरात क्रमांकः आस्था- पद भरती-२०२२/प्र.क्र. १४२/का. २(१)/ नाशिक

दिनांक: २३/११/२०२३

Adivasi Vikas Vibhag, शासन निर्णय क्रमांक पदआ-३८१७/प्रक्र.१३९/का.१५ दिनांक १६ नोव्हेंबर, २०२२ अन्वये सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला असून शासन निर्णय वित्त विभाग, क्र. पदनि-२०२२/प्रक्र.२/२०२२/ आ.पु.क. दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२२ अन्वये ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे त्या विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार आयुक्त, Adivasi Vikas Vibhag, महाराष्ट राज्य नाशिक हे त्यांचे अंतर्गत अपर आयुक्त, कार्यालय नाशिक/ ठाणे/ अमरावती / नागपुर यांचे अधिनस्त आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल-मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) / आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल/ प्रयोगशाळा सहाय्यक / प्राथमिक शिक्षण सेवक (नॉनपेसा) / माध्यमिक शिक्षण सेवक (नॉनपेसा) / उच्च माध्यमिक शिक्षण सेवक (नॉनपेसा) तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ. भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील निम्न नमूद सरळसेवेची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/ या लिंक वर उपलब्ध करुन दिलेली आहे.

परिक्षेचे वेळापत्रक :-

ऑनलाईन पध्दतीने अर्ज व परिक्षा शुल्क भरण्याचा दिनांक व वेळ दिनांक- २३.११.२०२३ दुपारी १५.०० वाजता पासुन

ऑनलाईन परिक्षेचा दिनांक ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक- दिनांक १३.१२.२०२३ रात्री २३.५५ वाजे पर्यंत.

या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल- https://tribal.maharashtra.gov.in

भरती प्रकिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सुचना वगैरे https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसुन या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.

१. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी, अटी व शर्ती :-

१. जाहिरातीत नमूद केलेल्या पद संख्येत व प्रवर्गनिहाय आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

२. पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा / सूचना वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणा / सूचनांच्या आधारे प्रस्तुत स्पर्धा परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

३. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. तथापि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जाहिरातीत नमूद नसलेल्या समांतर आरक्षणाकरीता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पद सख्येमध्ये बदल/वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता एखाद्या समांतर आरक्षणासाठी पद उपलब्ध नसले तरीही उमेदवारांनी सदर जाहिरातीस अनुसरून अर्ज करावेत. ४. परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व प्रवर्गनिहाय पद संख्येमध्ये बदल करण्याचे तसेच

भविष्यात शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल झाल्यास त्याबाबत संकेतस्थळावर प्रसिध्दीच्या अधिन राहून अटी-शर्तीमध्ये बदल

करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी व त्यांचे नियंत्रण अधिकारी यांचेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. ५. महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अंशकालीन, दिव्यांग तसेच अनाथासाठीचे समांतर आरक्षण शासनाने या सदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील.

६. महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे, तसेच महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग, शासन निर्णय क्र-महिआ-२०२३/कार्या-२ दिनांक ०४ मे २०२३ अन्वये खुल्या गटातील महिलाकरिता आरक्षित असलेल्या पदांसाठी निवडीकरिता नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची अट रदद करण्यात आलेली आहे.

७. एखादी जात / जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे अर्ज करतानाच उपलब्ध असेल तर सबधित जात/जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.

८. विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब) गटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असुन आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्यावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवतेच्या आधारावर करण्यात येईल.

९. समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही १०१२/प्र.क्र.१६/१२/१६- अ. दिनांक १३ ऑगस्ट २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण- १११८/प्र.क्र.३९/१६-अ. दिनाक १९ डिसेंबर, २०१८ आणि तद्नतर शासनाने यासदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही

करण्यात येईल. १०. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्लूएस) उमेदवारांकरिता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः सघाओ ४०१९/प्र.क्र.३१/१६-अ, दिनांक १२ फेब्रुवारी, २०१९ व दिनांक ३१ मे, २०२१ अन्वये विहीत करण्यात आलेले प्रमाणपत्र

कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.

११. अद्यावत नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्र / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिका-याने वितरीत केलेले व अर्ज सादर करण्याच्या अतिम दिनाकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

१२. सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) पदावरील निवडीकरीता विचार करणेबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल.

१३. अराखीव (खुला) उमेदवाराकरीता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषसदर्भातील अटीबी पुर्तता करणाऱ्या सर्व उमेदवाराचा (मागासवर्गीय उमेदवारासह) अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरिता विचार होत असल्याने, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित / उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्याच्या मूळ प्रवर्गा सदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.

१४. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल

१५. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. मकसी १००७/ प्र.क्र.३६/ का.३६. दि. १० जुलै, २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सागितलेल्या ८६५ गावातील मराठी भाषिक उमेदवार संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमातील सर्व अटींची पूर्तता करीत असल्यास ते उमेदवार त्या संबंधित पदांसाठी अर्ज करू शकतील. त्यासाठी संबंधित मराठी भाषिक उमेदवारानी ते महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या ८६५ गावातीलच रहिवासी असल्याबाबतचा त्यांचा वास्तव्याचा सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला सादर करणे अनिवार्य राहील.

१६. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता (सामाजिक अथवा समांतर अथवा सोयी सवलतींचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कायदा/नियम/आदेशानुसार) विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्विकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापूर्वीचे वैध असणारे प्रमाणपत्र उपलब्ध असणे आवश्यक आहे.

१७. सामाजिक व समांतर आरक्षणासदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधिन राहून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल.

१.१८ खेळाडु आरक्षण

१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक संकीर्ण: १७१४/प्र.क्र.३२५/क्रीयुसे-२, दिनांक २२ एप्रिल २०१५ शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: राक्रीचो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे- २. दिनाक १ जुलै, २०१६. तसेच शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: राक्रीपो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १८ ऑगस्ट, २०१६. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक संकीर्ण: १७१६/प्र.क्र.१८/क्रीयुसे-२, दिनांक ३० जून २०२२, आणि तद्नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलती सदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

२) प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकान्याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनाकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे.

३) खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच तो खेळाडू उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, याविषयीच्या पडताळणीकरीता त्याचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे, अन्यथा प्राविण्य प्राप्त खेळाडूसाठी आरक्षणाकरीता पात्र समजण्यात येणार नाही.

४) एकापेक्षा जास्त खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे असणाऱ्या खेळाडु उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांचे प्राविण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरीता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.

५) कागदपत्रे पडताळणीवेळी खेळाडू उमेदवारांनी विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्राविण्य प्रमाणपत्र तसेच त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच खेळाडू कोणत्या संवर्गातील आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, याविषयीचा सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्राविण्य प्रमाणपत्र

पडताळणी बाबतचा अहवाल सादर केला तरच उमेदवाराचा संबंधित संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर

शिफारस / नियुक्तीकरीता विचार करण्यात येईल.

१.१९ दिव्यांग आरक्षण:-

१. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक दिव्यांग २०१८/प्र.क्र. ११४/१६ अ. दिनाक २९ मे, २०१९ तसेच यासदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

२. प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या सवर्ग/पदाच्या बाबतीत शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्रमाक अपग- २५१९/प्रक्र.०३/का-१५ दिनाक १६.०२.२०२१ अन्वये दिव्यांगासाठीची पदे सुनिश्चित करण्यात आली आहेत.

. दिव्यांग व्यक्तीसाठी असलेली पदे भरावयाच्या एकूण मंजुर पदसंख्येपैकी असतील. ४. दिव्याग व्यक्तीची सबधित सवर्ग पदाकरीता पात्रता शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या

आदेशानुसार राहिल. ५. दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदांवर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे, याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमाकानुसार त्यांची शिफारस करण्यात येईल.

६. संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकारचे किमान ४०% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार / व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी / सवलतीसाठी पात्र असतील.

७. दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या वयोमर्यादेचा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमाक अप्रकी २०१८ / प्र. क्र. ४६ / आरोग्य ६ दिनाक १४ सप्टेंबर, २०१८ मधील आदेशानुसार केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in अथवा SADM या संगणकीय प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

१.२० अनाथ आरक्षण:-

१. अनाथ व्यक्तीचे आरक्षण शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, क्रमाकः अनाथ २०१८/प्र.क्र.१८२/का-०३. दिनांक २३ ऑगस्ट, २०२१, शासन निर्णय क्र. अनाथ-२०२२/प्र.क्र./१२२/का.-०३ दिनाक ६ एप्रिल २०२३ व समक्रमांकाचे शासन पुरक पन्त्र दि. १० मे २०२३, तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील.

२. महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभागाकडील, शासन निर्णय क्रमांक अनाथ-२०१८/प्र.क्र.१८२/का.-०३ दिनांक ०६ सप्टेंबर २०२२ तसेच दि. ६ एप्रिल २०२३, अन्वये अनाथ प्रवर्गासाठी दावा दाखल करणा-या उमेदवाराने अर्ज सादर करतेवेळी महिला व बाल विकास विभागाकडील सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल. अन्य यंत्रणेकडून वितरीत करण्यात आलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.

३. अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन शासन सेवेत रुजू होणा-या उमेदवाराला अनाथ प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल. नियुक्ती पश्चात ६ महिन्यांच्या कालावधीत आयुक्त, महिला व बालविकास पूर्ण यांचेकडून अनाथ प्रमाणपत्राची पडताळणी करुन घेण्याची जबाबदारी सबंधित नियुक्ती प्राधिकारी /विभाग प्रमुख याची राहिल.

४. अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे त्या प्रवर्गातून करण्यात येईल.

५. पूर्व परीक्षेच्या अर्जाद्वारे अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारानी त्याचेकडे सद्यस्थितीत उपलब्ध असलेले प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसेच दिनांक २३ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार सुधारित नमुन्यातील अनाथ प्रमाणपत्र व महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा अनाथ आरक्षणाचा दावा विचारात घेतला जाणार नाही.

ap

१.२१ माजी सैनिकांकरीता आरक्षण:-

१. उमेदवार स्वतः माजी सैनिक असल्यास त्याने त्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यास माजी सैनिकांना अनुज्ञेय असलेले लाभ मिळणार नाहीत. गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या माजी सैनिक उमेदवारांनी जिल्हा सैनिक बोर्डात नाव नोंदणी केली असल्यास मुळ प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. निवड झालेल्या माजी सैनिक उमेदवारांच्या कागदपत्रांची सक्षम अधिकाऱ्याकडुन पडताळणी झाल्याशिवाय त्याना नियुक्ती आदेश देण्यात येणार नाही.

२. माजी सैनिकांकरीता आरक्षणा संदर्भातील तरतुदी शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार असतील.

३. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. आरटीए-१०८२/३५०२/सीआर-१००/१६-अ. दि.२ सप्टेंबर १९८३ नुसार माजी सैनिक अ) माजी सैनिकासाठी आरक्षित असलेल्या पदावर भरती करताना युध्द काळात किवा युध्द नसतांना सैन्यातील सेवेमुळे दिव्यांगत्व आले असल्यास असा माजी सैनिक १५% राखीव पदांपैकी उपलब्ध पदांवर प्राधान्य क्रमाने नियुक्ती देण्यास पात्र राहील. आ) युध्द काळात किंवा युध्द नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा अपंगत्व येऊन त्यामुळे नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकाच्या कुटूंबातील फक्त एका व्यक्तिला त्या नंतरच्या पसंती क्रमाने १५% आरक्षित पदापैकी उपलब्ध पदावर नियुक्तीस पात्र राहील, तथापि सदर उमेदवाराने ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्यापदाची शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.

४. आवश्यक प्रमाणपत्र:-

अ. सैनिकी सेवेतून मुक्त केल्याबाबतचे प्रमाणपत्रः- माजी सैनिकासाठी असलेल्या वयोमर्यादा व आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यात सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

आ. जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्रः-

उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गामध्ये समाविष्ट होत असेल, त्या प्रवर्गासबंधीचे जात प्रमाणपत्र तसेच वैध नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास) सादर करणे आवश्यक आहे.

१.२२. प्रकल्पग्रस्तांसाठीचे आरक्षण:-

१) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक एईएम-१०८०/३५/१६-अ, दिनांक २०/०१/१९८० तसेच या संदर्भात शासनाकडुन वेळोवेळी नमुद करण्यात येणाऱ्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तांसाठीचे आरक्षण राहील. गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या प्रकल्पग्रस्त उमेदवारानी सक्षम अधिकारी यांचेकडील प्रकल्पग्रस्त असलेबाबतचे शासकीय नोकरी मिळणेसाठी विहित केलेले मुळ प्रमाणपत्र कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करणेबंधनकारक राहील. लेखी परीक्षेत निवड झालेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांचे मुळ प्रमाणपत्र हे संबंधित प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या अधिकारी यांचे कार्यालयाकडून पडताळणी करुन घेतले जाईल. सदर पडताळणी अंती प्राप्त होणाऱ्या अहवालाच्या आधारे सदर प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती आदेश देणेबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

१.२३. भुकंपग्रस्तांसाठीचे आरक्षण:-

१) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक भुकंप-१००९/प्र.क्र.२०७/२००९/१६-अ, दिनांक २०/०८/२००९ तसेच या संदर्भात शासनाकडुन वेळोवेळी नमुद करण्यात येणाऱ्या आदेशानुसार भुकंपग्रस्तासाठीचे आरक्षण राहील. तसेच गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या भुकंपग्रस्त उमेदवारांनी सक्षम अधिकारी यांचेकडील भुकंपग्रस्त असलेबाबतचे शासकीय नोकरी मिळणेसाठी विहित केलेले मुळ प्रमाणपत्र कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील. लेखी परिक्षेत निवड झालेल्या भुकंपग्रस्त उमेदवारांचे मुळ प्रमाणपत्र हे संबंचित प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या अधिकारी यांचे कार्यालयाकडुन पडताळणी करुन घेतले जाईल. सदर पडताळणी अंती प्राप्त होणाऱ्या अहवालाच्या आधारे सदर प्रवर्गातील उमेदवाराना नियुक्ती आदेश देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

१.२४. पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांचे करीता आरक्षण

१) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमाक प्रअंक १००९/प्र.क्र.२००/२००९/१६-अ, दि. २७/१०/२००९ व क्र.अशंका-१९१३/प्र.क्र.५७/२०१३/१६-अ, दि.१९.९.२०१३ नुसार शासकीय कार्यालयामध्ये ३ वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या उमेदवाराने सदरच्या अनुभवाची रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये नोंद केलेली असणे आवश्यक राहील. निवड झालेल्या अंशकालीन कर्मचाऱ्यांची त्यांच्या अनुभवाचे सेवायोजन कार्यालयाकडील मुळ प्रमाणपत्र व तहसिलदार यांचेकडील प्रमाणपत्र कागदपत्रांच्या पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील तसेच या संदर्भात शासनाकडुन वेळोवेळी नमुद्र करण्यात येणाऱ्या आदेशानुसार पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांचे करीता आरक्षण राहील. १) उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

२. पात्रता :-

२) वयोमर्यादा-

अ. जाहिरातीत नमुद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक ०१.११.२०२३ या तारखेस गणण्यात येईल.

आ. जाहिरातीत नमुद केलेल्या पदासाठी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. एसआरव्ही- २०१५/प्र.क्र.४०४/ कार्या. १२, दिनांक २५ एप्रिल २०१६ मधील तरतुदीनुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान वय १८ वर्ष असावे व कमाल वय ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.

इ. उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षमः

 

१. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. एसआरव्ही-२०१५/प्र.क्र.४०४/ कार्या.१२, दिनांक २५ एप्रिल २०१६ मधील तरतुदी नुसार महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत १८ पेक्षा कमी व ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.

भज-ड, वि.मा.प्र, इ.मा.व, एस.ई.बी.सी आणि ई.डब्ल्यु. एस (आर्थिकदृष्टया दुर्बल घटक) प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची सवलत लागू राहणार नाही.

२. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. एसआरव्ही-१९९८/प्र.क्र.३९/१६-अ/ १६.१.२००१ मधील तरतुदीनुसार, दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत उच्चतम वयोमर्यादा सरसकट ४५ वर्ष इतकी राहील.

३. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासन निर्णय क्र. राक्रीधो-२००२/प्र.क्र.०८/२०१०/१६-अ/दि.६.१०.२०१० मधील तरतुदी नुसार, खेळाडूची गुणवत्ता व पात्रता विचारात घेवुन सदर पदासाठी मागासवर्गीय उमेदवारासाठी देखील कमाल वयोमर्यादा ४३ इतकी राहील.

४. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. गासैक-१०१०/प्र.क्र.२७९/१६-अ/दि.२०.८.२०१० मधील तदतुदी नुसार माजी सैनिकांसाठी विहीत वयोमर्यादेतील सुट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील. तसेच दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षेपर्यंत राहिल.

५. अनाथ उमेदवाराच्या बाबतीत ४३ वर्षापर्यंत.

६. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र.अशंका-१९१८/प्र.क्र.५०७/१६-अ/दि. ०२.०१.२०१९ मधील

तरतुदीनुसार अशकालीन उमेदवाराच्या बाबतीत ५५ वर्षापर्यंत ७. विहीत वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही.

८. शासन निर्णय क्र सनिव २०२३/प्र.क्र.१४/कार्या/१२ / दिनांक ३.३.२०२३ नुसार खुल्या संवर्गासाठी ३८ व

 

४) अर्हता / पात्रता गणण्याचा दिनांक-

सर्व पदांकरिता दिनाक ०१.११.२०२३ रोजी विहित शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण केलेला असणे अनिवार्य आहे.

५) निवडप्रक्रिया:-

৭. जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रते विषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.

२. सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात

येणाऱ्या सुधारणा तसेच तरतुदीनुसार राबविण्यात येईल :-

1. वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, (सेवा प्रवेश) नियम १९८८, दिनांक:-७/१०/१९८८ ॥. सशोधन सहाय्यक (सेवा प्रवेश) नियम २००६, दिनाक:-१०/०१/२००६.

ii. उपलेखापाल/ मुख्यलिपिक (सेवा प्रवेश) नियम २००६, दिनांक:-१०/०१/२००६.

iv. आदिवासी विकास निरिक्षक (सेवा प्रवेश) नियम २००६, दिनांक:-१०/०१/२००६. v. वरिष्ठ लिपीक/ साख्यिकी सहाय्यक (सेवा प्रवेश) नियम, १९८२ दिनांक ०७/०८/१९९०

vi. लघुटंकलेखक/ निम्नश्रेणी लघुलेखक / उच्चश्रेणी लघुलेखक सामान्य प्रशासन विभाग, (सेवा प्रवेश) नियम,

१९९७ दिनाक- २४/०६/१९९७

vii. ग्रंथपाल, (सेवा प्रवेश) नियम २००६, दिनाक:- १०/०१/२००६.

viii. सहाय्यक ग्रंथपाल (सेवा प्रवेश) नियम २००६, दिनाक:-१०/०१/२००६.

ix. प्रयोगशाळा सहाय्यक (सेवा प्रवेश) नियम २००६, दिनांक:-१०/०१/२००६.

x. गृहपाल स्त्री/ पुरुष, (सेवा प्रवेश) नियम १९८४, दिनांक:- ०७/०६/१९८४ xi. अधिक्षक श्री/ पुरुष, (सेवा प्रवेश) नियम २००६, दिनांक:-१०/०१/२००६

xii. प्राथमिक शिक्षण सेवक, (सेवा प्रवेश) नियम १९८४, दिनांक:- ०७/०६/१९८४

xiii. माध्यमिक शिक्षण सेवक, (सेवा प्रवेश) नियम १९८४, दिनांक:- ०७/०६/१९८४ xiv. उच्च माध्यमिक शिक्षण सेवक, (सेवा प्रवेश) नियम २००६, दिनाकः १०/०१/२००६

६) निवडीची पद्धत :-

१. सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातुन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल, परीक्षा राज्यातील जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल,

२. संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त

गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवाराची निवड केली जाईल, गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने

किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ३. संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणान्या ऑनलाईन परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील.

४. ज्या पदासाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदाकरीता उमेदवाराची निवड करताना सगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवुन एकूण २०० गुणांची असेल. परिक्षा कालावधी दोन तासांचा राहील.

५. संगणक आधारीत ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे राहील

७) परिक्षा शुल्क:-

१) अमागास रुपये १०००/-

२) मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्याग/माजी सैनिक रुपये ९००/- (१० टक्के सुट)

३) परीक्षा शुल्क ना परतावा (Non refundable) आहे.

८) अर्ज करण्याची पध्दतः-

१) उमेदवार कोणत्याही अपर आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या पदासाठी अर्ज करुन शकेल. अशा उमेदवारांस तो त्याने राज्यातील निवड केलेलया परिक्षा केंद्रावर परिक्षेस उपस्थित राहून परिक्षा देणे बंधनकारक राहिल.

२) शैक्षणिक अर्हतेनुसार उमेदवारास एका पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास, प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज

व स्वतंत्र परिक्षा शुल्क भरावे लागेल. ३) उमेदवारास अर्ज करतांना अपर आयुक्त, नाशिक / अमरावती / ठाणे व नागपुर या चार अपर आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील पदापैकी एकाच पदाकरीता अर्ज करायचा असल्यास कोणत्याही एकाच अपर आयुक्त कार्यालयासाठी अर्ज करणे बंधनकारक राहील.

४) प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाइन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येईल.

५) पात्र उमेदवाराला वेव आधारीत (web-based) ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/या

संकेतस्थळाद्वारे दिनांक २३.११.२०२३ ते १३.१२.२०२३ या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.

) विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

(७) उमेदवाराच्या पात्रतेनुसार उमेदवार एका पेक्षा जास्त पदाकरीता अर्ज करु शकेल, तथापि, प्रत्येक पदाकरीता स्वतंत्रपणे अर्ज करणे बंधनकारक राहील व प्रत्येक पदाकरीता स्वतंत्र शुल्क भरणे बंधनकारक राहिल.

९) ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना :-

१) उपरोक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/या संकेतस्थळावर मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना विभागाव्या संकेतस्थळावर दिनांक २३.११.२०२३ ते दिनाक १३.१२.२०२३ या कालावधीमध्ये वेब बेस्ड (Web-Based) ऑनलाईन आवेदन पत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क गरणा दिनांक २३.११.२०२३ ते दिनांक १३.१२.२०२३ या कालावधीमध्ये करता येईल.

) विहित पद्धतीने मुदतीत म्हणजेच दिनांक १३.१२.२०२३ पर्यंत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरण्याची कार्यवाही दिनाक १३.१२.२०२३ रोजी रात्री २३.५५ वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानतर सदर वेब लिंक बंद होईल.

३) परीक्षा स्थगित व रद्द करणे, परीक्षेचे स्वरूप, परीक्षेची तारीख व ठिकाणात बदल करणे, पदसंख्या वाढ किंवा घट करण्याचे अधिकार विभागास राहतील व विभागाचा निर्णय अंतिम असेल, त्याबाबत कोणताही दावा सांगता येणार नाही. तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात वा तक्रारी बाबत निर्णय घेण्याचा अधिकार विभागास राहील व विभागाचा निर्णय अंतिम असेल.

याबाबत कोणत्याही पत्र व्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.

४) उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्याच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक सपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास भरतीच्या कोणत्याही टप्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी व पात्रता तपासूनच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावा.

५) उमेदवाराची परीक्षा ही त्यानी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतीही कागदपत्रे पूर्व तपासणी / छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. कागदपत्रांच्या पूर्ण छाननीनंतरच उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल. उमेदवाराना ऑनलाईन परीक्षेतील मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार अंतरिम यादी प्रसिद्ध करून उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी केली जाईल. सदर प्रक्रियेत उमेदवार अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्यावर अपात्र करण्याचे सर्व अधिकार नियुक्ती प्राधिकारी राखून ठेवीत आहेत.

६) परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रात किंवा परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल, गणकयंत्र (calculator), आय पेंड वा तत्सम

इलेक्ट्रॉनिक यत्रे किंवा इतर सपर्काची साधने वापरण्यास सक्त मनाई आहे.

७) उमेदवारास परीक्षा / कागदपत्र पडताळणी इत्यादी करीता स्वखर्चाने यावे लागेल.

८) ऑनलाईन परीक्षा स्थळामध्ये वाढ / बदल करण्याचे अधिकार विभागाकडे राहतील. परिक्षेचे ठिकाण, वेळ, दिनांक उक्त

संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षेचे प्रवेशपत्र उक्त संकेतस्थळावरून स्वतंत्र लिंक द्वारे उपलब्ध करुन दिले जाईलव उमेदवाराने स्वतः डाऊनलोड

९) करुन घेण्याची जवाबदारी सर्वस्वी उमेदवाराची असेल. परीक्षेचे प्रवेशपत्र इतर कोणत्याही पद्धतीने पाठविले जाणार नाही.

१०) पात्र उमेदवारांचा अंतिम निकाल विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

१०. उमेदवारानी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यापूर्वी लक्षात घेण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे

१०.१ ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे / स्वाक्षरी इत्यादीचे स्कॅन करून ठेवावे.

१ १०.१ छायाचित्र (४.५ से.मी. x ३.५ से.मी.)

१०.१ २ स्वतःची स्वाक्षरी (काळ्या शाईने)

१०.१ ३ स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा (काळ्या किंवा निळ्या शाईने पाढऱ्या कागदावर)

१०.१ ४ इंग्रजी भाषेतील खाली दिलेला मजकुर असलेले स्वहस्ताक्षरात लिहिलेले घोषणापत्र (काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर)

१०.१ हे सर्व स्कॅन केलेले दस्तऐवज या जाहिरातीतील मुद्दा ११:३ मध्ये नमूद तपशिलाप्रमाणे आहेत याची खात्री

१०.१६ उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी करावी

इंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरातील (Capital Letters) स्वाक्षरी स्विकारली जाणार नाही

१०.१ ७ डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरित्या स्कॅन केलेला असावा आणि त्यावर डाग येऊ देऊ नये. (उमेदवारास अंगठा नसल्यास असा उमेदवार अर्ज करण्यासाठी उजव्या अंगठ्याचा वापर करू शकतो)

१०.२. हस्तलिखित घोषणेचा मजकूर खालीलप्रमाणे आहे:-

Declaration

I, (name of the candidate) hereby declare that all the Information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.

(उमेदवाराची स्वाक्षरी)

१०:३ वर नमूद केलेले घोषणापत्र उमेदवाराने स्वहस्तलिखित आणि फक्त इंग्रजी भाषेत लिहिलेले असावे इतर लिहिलेले आणि अपलोड केले असल्यास, त्या उमेदवाराचा अर्ज अवैध मानला जाईल. (दृष्टीहीन कोणत्याही भाषेत उमेदवारांच्या बाबतीत जे स्वहस्ते लिहू शकत नाहीत त्यांनी घोषणेचा मजकूर टाईप करून टाईप केलेल्या घोषणेच्या खाली डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा लावाना आणि तपशिलानुसार कागदपत्र अपलोड करावे)

१०.४. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा करण्यासाठी आवश्यक सर्व माहिती व कागदपत्रे तयार ठेवावीत.

90.4 उमेदवारांकडे स्वत:च्या चालू स्थितीतील वैध वैयक्तिक ई-मेल आयडी आणि भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक असावा, स्वतःचा ई-मेल आयडी नसल्यास तयार करून घेण्यात यावा. वैयक्तिक ई-मेल आयडी आणि भ्रमणध्वनी क्रमांक सदरची भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू (सक्रिय) ठेवावा, नोंदणीकृत ई मेल आयडीद्वारे परीक्षेसाठी प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी सूचना देण्यात येतील.

११. अर्ज भरण्याची कार्यपद्धती आणि सूचना :-

११.१ अर्ज नोंदणी-

११ उमेदवाराला https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/ या संकेतस्थळावर लॉगइन (Login) करावे लागेल.

११ उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा

१२ (APPLY ONLINE) या पर्यायावर क्लिक (Chick) करा जे एक नवीन स्क्रीन उघडेल

१ ३ अर्ज नोंदणी करण्यासाठी, "नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा" (Click here for New Registration) निवडा ११ आणि नाव, संपर्क तपशील आणि ई-मेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल, उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक ११ आणि पासवर्ड नोंदवावा तात्पुरती नोंदणी क्रमांक (Registration No) आणि पासवर्ड (Password) दर्शविणारा ई-मेल आणि एसएमएस देखील पाठविला जाईल. जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल, तर तो जतन करा पुढे जा" (SAVE AND NEXT) टेंब

१ ४ निवडुन आधीच प्रवेश केलेला डेटा जतन करू शकतो. ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाईन अर्जातील तपशिलांची पडताळणी करण्यासाठी व आवश्यक बदल करण्यासाठी "जतन करा पुढे जा (SAVE AND NEXT) सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दृष्टिहीन उमेदवारानी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिमरित्या सादर करण्यापूर्वी ते योग्य असल्याची खात्री करण्यासाठी तपशीलांची पडताळणी करून घ्यावी.

१ ५ उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी स्वत करावी

"एकदा पूर्ण नोंदणी बटणावर (COMPLETE REGISTRATION BUTTON) क्लिक केल्यानंतर अर्जामध्ये

१ ६ कोणताही बदल करता येणार नाही. उमेदवाराने स्वतःचे नाव, त्याचे / तिचे किवा वडील पत्तीचे नाव जसे प्रमाणपत्रे/गुणपत्रिका/ओळखपत्र पुराव्यामध्ये नमूद आहे. त्याप्रमाणेच अर्जामध्ये नमूद करण्यात यावे. उमेदवाराच्या ओळखपत्र / पुराव्यामधील

नाव व अर्जामध्ये नमूद केलेले यामध्ये कोणताही बदल आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.

१७ उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद केलेले तपशील सत्यापित (Validate) करून आपला अर्ज जतन करण्यासाठी Validate your details 4 Save and Next बटणावर क्लिक (Click) करून अर्ज जतन करावा.

या सुचनांतील मुद्दा ११.३ मध्ये छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक सुचनामध्ये नमूद केलेल्या तपशिला नुसार उमेदवार त्यांचे फोटो व स्वाक्षरी अपलोड करू शकतील

उमेदवाराने त्यांचे इतर तपशील अर्जामध्ये नमूद करावेत.

१ ९ १ १० अर्जाच्या संपूर्ण नोंदणीपूर्वी अर्जदाराने आपल्या अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी Preview बटणावर क्लिक करून अर्जाचे पूर्वावलोकन व पडताळणी करावी भरलेले अर्ज, (छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशिल बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच "COMPLETE REGISTRATION ONLY / पूर्ण नोंदणी वर क्लिक करा. ११ परीक्षा शुल्क भरणा करण्यासाठी (Payment) टॅबवर क्लिक (Click) करा आणि भरण्यासाठी (Fees Payment) साठी पुढे जावे.

१ १२ सादर (Submit) बटणावर क्लिक (Click) करा

टीप: (अ) USERNAME आणि PASSWORD जतन करण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल.

(ब) उमेदवाराने नोंदणी प्रक्रीयेसाठी स्वतःचाच वैध/प्रमाणित ई-मेल आयडी वापरावा, अन्य व्यक्तींचा ई-मेल आयडी वापरु नये.

११.२ ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे :

·         ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासह भरण्याची सुविधा (payment gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून परीक्षा शुल्क भरणा करण्यात यावा.

·         परीक्षा शुल्क भरणा डेबिट कार्ड (RuPay/Visa/MasterCard/Maestro), क्रेडिट कार्ड, इटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्ड/UPI/ मोबाइल वॉलेट वापरून केले जाऊ शकते

·         ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्या बाबतची माहिती सादर केल्यानंतर, कृपया सर्व्हरकडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा करा. परीक्षा शुल्क पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागे (Back)/ रिफ्रेश (Refresh) बटण (Key) दाबू नये.

·         व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर एक ई- पावती (E-Receipt) तयार होईल. ती जनत करुन ठेवावी. 'ई पावती (E-Receipt) तयार न होणे परीक्षा शुल्क भरणा अयशस्वी झाल्याचे दर्शवते. Payment अयशस्वी झाल्यास, उमेदवारांनी त्यांचा तात्पुरता नोंदणी क्रमांक (Registration No) आणि पासवर्ड

·         (Password) वापरून पुन्हा लॉग इन करावे आणि Payment ची प्रक्रिया पुन पूर्ण करण्यात यावी.

·         स्क्रीनवर

·         उमेदवारानी परीक्षा शुल्क भरल्याची ई- पावती (E-Receipt) आणि फी चा तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत (Print out) काढून घेणे आवश्यक आहे. ई- पावती व अर्जाची प्रत 'न आल्यास ऑनलाईन व्यवहार यशस्वी झाला नसल्याचे दर्शविते.

·         क्रेडिट कार्ड वापर कर्त्यासाठी:- सर्व शुल्क भारतीय रुपयामध्ये सूचीबद्ध आहेत. तुम्ही गैर-भारतीय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमची बैंक प्रचलित विनिमय दरावर आधारित तुमच्या स्थानिक चलनात रूपांतरित करेल.

·         तुमच्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, कृपया तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ब्राउझर विडो Browser window) बद करा.

·         फी भरल्याचा तपशील असलेल्या अर्जाची मुद्रीत प्रत (Printout) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

स्कॅनिंग आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मार्गदर्शक सूचना:-

·         ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराकडे खाली दिलेल्या तपशिलानुसार त्याचे छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा उसा आणि स्वहस्ताक्षरातील इंग्रजी भाषेतील घोषणापत्र यांची स्कॅन केलेली (डिजिटल) प्रतिमा असणे आवश्यक आहे.

·         छायाचित्र प्रतिमा (४.५ст x ३.५ст) :-

·         छायाचित्र अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचे रंगीत असणे आवश्यक आहे.

·         सदरचे छायाचित्र रंगीत, हलक्या रंगाच्या विरुद्ध, शक्यतो पांढया पार्श्वभूमीवर घेतलेले आहे याची खात्री करा.

·         कॅमे-याकडे शांतपणे व स्थिर नजरेने पाहावे

·         छायाचित्र सुर्यप्रकाशात काढलेले असेल तर आपल्या छायाचित्रावर सावली पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

·         तुम्हाला फ्लॅश वापरायचा असल्यास, "Red Eye" येणार नाही याची दक्षता घ्यावी.

·         जर तुम्ही चष्मा घालत असाल तर त्यात कोणतेही प्रतिबिंब येणार नाही आणि तुमचे डोळे स्पष्टपणे दिसू शकतील याची खात्री करा

·         छायाचित्र काढतेवेळी टोपी, हॅट व गडद चष्मा घालू नये. धार्मिक पगडी (Headwear) वापरण्यास परवानगी आहे, परंतु त्यामुळे तुमचा चेहरा झाकता कामा नये.

·         परिमाण २०० x २३० पिक्सेल (प्राधान्याने).

·         फाईलचा आकार २० kb ५० kb दरम्यान असावा.

·         स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार ५०० पेक्षा जास्त नसल्याची खात्री करा. जर फाईलचा पेक्षा जारत अरोल, तर स्कॅनरची सेटिंग्ज समायोजित करा जसे की DPI रिझोलुशन, नंबर ऑफ कलर

११.३.२. स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि स्वहस्ताक्षरातील इंग्रजी भाषेतील घोषणापत्र प्रतिमाः-

अर्जदाराला पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या पेनने स्वाक्षरी करावी लागेल.

परिमाण १४० x ६० पिक्सेल (प्राधान्याने).

फाईलचा आकार १० kb to २०kb दरम्यान असावा. रकॅन केलेल्या प्रतिमेचा आकार २०kb पेक्षा जास्त नसल्याची खात्री करा.

अर्जदाराने त्याच्या डाव्या अंगठ्याचा ठसा काळ्या किंवा निळ्या शाईने पांढल्या कागदावर लावावा.

फाईल प्रकार: jpg / jpeg

६ परिमाणे:- २०० DPI मध्ये २४० x २४० पिक्सेल (आवश्यक गुणवत्तेसाठी प्राधान्य म्हणजे ३ सेमी ३ सेमी

(रुंदी उंची).

१० परिमाणे २०० DPI मध्ये ८०० x ४०० पिक्सेल (आवश्यक गुणवत्तेसाठी प्राधान्य) म्हणजे १० सेमी ५ रोगी

फाईल आकार २० KB to ५० KB

अर्जदाराने पांढऱ्या कागदावर इंग्रजीत काळ्या शाईने स्पष्टपणे घोषणा लिहावी.

फाईल प्रकार:- jpg/jpeg

(रुंदी उंची)

फाईल आकार: ५० KB १०० KB

स्वाक्षरी, डाव्या अंगठ्यावा उसा आणि स्वहस्ताक्षरातील इंग्रजी भाषेतील घोषणापत्र अर्जदाराचे असावे. इतर कोणत्याही व्यक्तीचे नसावे. स्वत चे

१३ परीक्षेच्या वेळी स्वाक्षरी केलेल्या उपस्थिती पत्रकावरील किवा प्रवेश पत्रावरील अर्जदाराची स्वाक्षरी अपलोड केलेल्या स्वाक्षरीशी जुळत नसल्यास, अर्जदारास अपात्र घोषित केले जाईल. १४

इंग्रजी मोठ्या अक्षरातील (Capital Letters) स्वाक्षरी / हस्तलिखित घोषणापत्र स्वीकारली जाणार नाही.

११.३.३ कागदपत्रे

स्कन करणे :-

स्कॅनर रिझोल्यूशन किमान २०० dpi (बिंदू प्रति इंच) वर सेट करा.

रंग मूळ रंगावर सेट करा.

वर नमूद केल्याप्रमाणे फाईलचा आकार असावा.

स्कॅनरमधील प्रतिमा छायाचित्र / स्वाक्षरी / डाव्या अंगठ्याचा ठसा / हाताने लिहिलेल्या घोषणेच्या काठावर क्रॉप करा, नतर प्रतिमा अंतिम आकारात क्रॉप करुन अपलोड करावी. (वर नमूद केल्याप्रमाणे).

प्रतिमा फाईल JPG किंवा JPEG फॉरमॅटमध्ये असावी. उदा: image०१.jpg किवा image09.jpeg. फोल्डर फायलीमध्ये सूचीबद्ध करून किंवा फाईल प्रतिमा चिन्हावर माउस हलवून प्रतिमा परिमाण तपासले जाऊ शकते. MS Windows / MS Office वापरणारे उमेदवार MS Paint किंवा MS Office Picture Manager वापरून jpeg फॉरमॅटमध्ये कागदपत्रे सहज मिळवू शकतात. फाइल मेनूमधील "Save As/ सेव्ह अॅज" पर्याय वापरून कोणत्याही फॉरमॅटमध्ये स्कॅन केलेले दस्तऐवज jpg/jpeg फॉरमॅटमध्ये जतन केले जाऊ शकतात. क्रॉप आणि नंतर आकार बदला पर्याय वापरून आकार समायोजित केला जाऊ शकतो.

११.३.४ कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया :-

ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराला छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि स्वहस्ताक्षरातील इंग्रजी भाषेतील घोषणापत्र अपलोड करण्यासाठी स्वतंत्र लिक प्रदान केल्या जातील.

संबंधित लिंकवर क्लिक करा छायाचित्र / स्वाक्षरी अपलोड करा / डाव्या अंगठयाचा उसा / स्वहस्ताक्षरातील इंग्रजी भाषेतील घोषणापत्र अपलोड करा.

सीन केलेले छायाचित्र / स्वाक्षरी / डाव्या अंगठ्याचा ठसा / स्वहस्ताक्षरातील इंग्रजी भाषेतील घोषणापत्र फाईल सेव्ह केलेली जागा ब्राउझ करा आणि निवडा.

त्यावर क्लिक करून फाईल निवडा.

ओपन / अपलोड पर क्लिक करा

फाईलचा आकार आणि स्वरूप निर्धारित केल्याप्रमाणे नसल्यास, एक त्रुटी संदेश प्रदर्शित केला जाईल.

अपलोड केलेल्या प्रतिमेची गुणवत्ता पाहण्यास पूर्वावलोकन (Preview) मदत करेल, अस्पष्ट / डागाळलेल्या प्रतिमा असल्यास त्या जागी स्पष्ट प्रतिमा पुनक्षा अपलोड करता येतील.

उमेदवाराने स्वतःचा फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे स्वहस्ताक्षरातील इंग्रजी भाषेतील घोषणापत्र अपलोड केल्याशिवाय त्याचा ऑनलाइन अर्ज नोंदणी होणार नाही.

टीप:-

१. छायाचित्रातील चेहरा किवा स्वाक्षरी किवा डाव्या अंगठ्याचा ठसा किंवा स्वहस्ताक्षरातील इंग्रजी भाषेतील घोषणापत्र

अस्पष्ट असल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.

उमेदवाराने ऑनलाईन अर्जामध्ये छायाचित्र / स्वाक्षरी/ डाव्या अंगठ्याचा ठसा स्वहस्ताक्षरातील इंग्रजी भाषेतील घोषणापत्र अपलोड केल्यानंतर उमेदवारानी त्यांच्या प्रतिमा स्पष्ट आहेत आणि योग्यरित्या अपलोड केल्या आहेत हे तपासावे. छायाचित्र किंवा स्वाक्षरी किंवा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा किवा स्वहस्ताक्षरातील इंग्रजी भाषेतील घोषणापत्र ठळकपणे दृश्यमान नसल्यास, उमेदवार आपला अर्ज सपादित (Edit) करू शकतो आणि त्याचे छायाचित्र किंवा स्वाक्षरी किवा डाव्या अंगठ्याचा ठसा किवा हाताने लिहिलेली घोषणा फॉर्म सबमिट करण्यापूर्वी पुन्हा अपलोड करू शकतो.

३. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करतेवेळी त्याचा फोटो व स्वाक्षरी ज्या ठिकाणी फोटो अपलोड करणे अपेक्षित आहे त्याच ठिकाणी अपलोड केले आहे याची खात्री करावी. फोटोच्या जागी फोटो आणि स्वाक्षरीच्या जागी स्वाक्षरी अपलोड केलेली नसल्यास उमेदवाराला परीक्षेला बसू दिले जाणार नाही, याची सर्वस्वी जवाबदारी उमेदवाराची असेल.

४.उमेदवाराने अपलोड करावयाचा फोटो आवश्यक आकाराचाच आहे व त्यामध्ये उमेदवाराचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे हे सुनिश्चित केले पाहिजे.

५. उमेदवारांनी अपलोड केलेली स्वाक्षरी स्पष्टपणे दिसत असल्याची खात्री करावी. ६. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या प्रणालीद्वारे तयार केलेल्या ऑनलाईन अर्जाची मुद्रीत प्रत (Print out) काढून घ्यावी.

१२. अर्ज करण्यासाठी इतर सूचना :-

उमेदवाराचे नाव, वडिलांचे, पतीचे नाव, आडनाव, आईचे नाव, जन्मदिनांक, भ्रमणध्वनी क्रमांक, छायाचित्र, स्वाक्षरी, पत्रव्यवहाराचा पत्ता ही मुलभूत माहिती आहे जी उमेदवाराला सविस्तर द्यावी लागेल.

पत्ता नमूद करताना उमेदवाराने आपल्या पत्त्याचा प्रकार निश्चित करावा. (उदा. पत्रव्यवहाराचा पत्ता व कायमचा पत्ता (किंवा दोन्ही)

त्यानंतर उमेदवाराने अतिरिक्त माहितीच्या पर्यायावर क्लिक करावे आणि आपल्या जात प्रवर्गाबद्दल माहिती भरावी.

ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे त्यांनी त्या संबंधित माहिती भरावी तसेच उमेदवाराने आधार क्रमांक/ आधार नोंदणी क्रमांक याबद्दलची माहिती द्यावी.

मराठी भाषेतील प्राविण्य, (D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किवा ० स्तर किवा A स्तर किवा B स्तर किवा C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किवा महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र) या संबंधीची माहिती भरावी.

एकदा शैक्षणिक तपशिल प्रविष्ट केल्यानंतर अर्जदारास पुढे (Next) या बटणावर क्लिक करावे लागेल, त्या बटणावर क्लिक केल्यानंतर अर्जदाराकडून पुष्टीची विनंती केली जाईल की त्यांनी ते बटण क्लिक केल्यास मागील तपशील संपादित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

आता उमेदवारास अर्ज करावयाच्या पदाची निवड करावी लागेल.

ऑनलाईन अर्ज स्विकारण्याच्या अंतिम तारखेस रात्री २३.५५ वाजेपर्यंत पुर्ण संकेतस्थळावरील लिंक बंद होईल.

जर कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा अधिक लॉग इन आयडीसह नोंदणी केली असेल तर उमेदवारांची। नव्याने केलेली यशस्वी नोंदणी फक्त पुढील प्रक्रिया जसे परीक्षा प्रवेशपत्र परीक्षेत उपस्थिती, गुणवत्ता यादी आणि अन्य संबंधित प्रक्रियांसाठी विचारात घेण्यात येईल. उमेदवारास ऑनलाईन अर्ज करताना कोणतीही शंका असल्यास त्याबाबत https://cgrs.ibps.in/ या हेल्पडेक्स लिक (Helpdesk link वर संपर्क साधता येईल.

टिप: नोंदणीमधील तपशील जसे की वापरकर्ता नाव (USERNAME). ई मेल आयडी, पसंतीचे स्थान, जन्म तारीख, उमेदवाराचे छायाचित्र (Photograph) आणि स्वाक्षरी इ. आवेदनपत्र सादर केल्यानंतर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

अर्जातील माहितीचे पूर्वावलोकन:-

युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन केल्यावर उमेदवार आपला संक्षिप्त अर्ज पाहू शकतो.

२ अर्ज प्रिंट करण्यासाठी प्रिंट प्रिव्हीव (Print Preview) या पर्यायावर क्लिक करा. नोद: उमेदवाराने आपला PDF स्वरूपातील अर्ज, परीक्षा प्रवेशपत्र संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वतः जतन करुन ठेवणे अनिवार्य राहील.

१३. परीक्षा केंद्र व परीक्षेबाबतच्या सर्वसाधारण सूचना:-

उपलब्ध परीक्षा केंद्रांची : परीक्षा केंद्र हे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाच्या ठिकाणी राहतील, व अपवादात्मक

दृष्ट्या प्रशासकीय दृष्ट्याच्या इतरत्र ठेवले जातील.

परीक्षेबाबतच्या सर्वसाधारण सूचना :-

उमेदवारांना नेमून दिलेले परीक्षा केंद्र व त्याचा पत्ता प्रवेश पत्रात नमूद करण्यात येईल संबंधित परीक्षा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.

उमेदवाराने एकदा केलेली परीक्षा केंद्राची निवड अंतिम असेल. परीक्षेचे केंद्र/स्थान/ तारीख/वेळ रात्र बदलण्याची कोणतीही विनती कोणत्याही परिस्थिती मध्ये (वैद्यकीय किंवा इतर कारणासाठी स्वीकारली जाणार नाही उमेदवाराने त्याची प्रवासाची व्यवस्था त्यानुसार आधीच ठरवावी.

३ कोणतेही परीक्षा केंद्र रद्द करणे आणि / किंवा परीक्षा केंद्र वाढविणे याचे अधिकार विभाग स्वत:कडे राखून ठेवीत आहे.

उमेदवाराला त्याने/तिने निवडलेल्या केद्रा व्यतिरिक्त इतर कोणतेही केंद्र वाटप करण्याचा अधिकार स्वतःकडे राखून ठेवीत आहे.

उमेदवाराने परीक्षा केंद्रावर स्वत:च्या जोखमीवर आणि स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे त्यासाठी त्यास कोणताही प्रवास खर्च वा मत्ता दिला जाणार नाही किवा उमेदवारास कोणत्याही स्वरूपाच्या इजा किवा नुकसानीसाठी विभाग जबाबदार राहणार नाही.

उमेदवारांनी एखाद्या विशिष्ट परीक्षा केंद्राची पुरेशा संख्येने निवड केलेली नसल्यास किवा एखाद्या केंद्राची निवड त्या केंद्राच्या उपलब्ध क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारानी केलेली असल्यास उमेदवाराना

ऑनलाईन परीक्षेसाठी इतर कोणतेही संलग्न केंद्र वाटप करण्याचा अधिकार विभागास राहील. उमेदवाराने भरणा केलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीमध्ये (अनेकदा अर्ज करणे, अर्ज चुकणे,

काही कारणास्तव परीक्षेस बसू न शकणे, इत्यादी अशा कारणांसाठी परत केले जाणार नाही.

१४. दिव्यांग व्यक्तींसाठी मार्गदर्शक सूचना :-

दृष्टिहीन व ज्यांच्या लेखन गतीवर कायमस्वरूपी प्रतिकूल परिणाम झालेला आहे असे उमेदवार ऑनलाईन परीक्षे दरम्यान खालील मुद्दा १४.८ आणि १४.९ मध्ये नमूद मर्यादेच्या अधीन राहून लेखनिकाचा वापर करू शकतात. जेथे

लेखनिक वापरला जातो अशा सर्व प्रकरणासाठी खालील नियम लागू होतील :-

उमेदवाराला त्याच्या / तिच्या स्वखर्चाने स्वत:च्या लेखनिकाची व्यवस्था करावी लागेल.

उमेदवाराने निवडलेला लेखनिक हा त्याच परीक्षेसाठी उमेदवार नसावा. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर वरील नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास, उमेदवार आणि लेखनिक या दोघांची उमेदवारी रद केली जाईल. परीक्षेत लेखनिकाच्या सेवा वापरण्यास पात्र व इच्छित उमेदवारानी ऑनलाईन अर्जामध्ये तसे नमूद करणे आवश्यक राहील. ऑनलाईन अर्जामध्ये तसे नमूद नसल्यास नतर लेखनिक वापरण्याची केलेली कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही.

लेखनिक म्हणून सेवा देणारी व्यक्ती एकापेक्षा जास्त उमेदवारांना लेखनिक म्हणून सेवा देऊ शकणार नाही. त्याबाबत उमेदवाराने आवश्यक ती काळजी घ्यावी.

लेखनिक उपरोल्लिखित सर्व विहित अर्हतेचे निकषाची पूर्तता करीत असल्याचे योग्य हमीपत्र उमेदवार आणि

लेखनिक दोघांनाही परीक्षा सुरु होण्यापूर्वी समवेक्षक / केंद्र प्रमुख यांचेकडे द्यावे लागेल. तद्नंतर जर उमेदवार किंवा लेखनिक विहित अर्हतेच्या निकषांची पूर्तता करीत नसल्याचे आढळून आल्यास किंवा त्यांनी मुलभूत माहिती दडविली असल्याचे निष्पन्न झाल्यास ऑनलाईन परीक्षेच्या निकालाची पर्वा न करता, अर्जदाराची

उमेदवारी रद्द केली जाईल.

जे उमेदवार लेखनिकाचा वापर करतात त्यांना परीक्षेच्या प्रत्येक तासासाठी २० मिनिटे अतिरिक्त वेळ भरपाई म्हणून देण्यात येईल, परीक्षेदरम्यान लेखनिकाने स्वतःहून प्रश्नांची उत्तर देऊ नयेत, असे कोणतेही वर्तन आढळल्यास अर्जदाराची उमेदवारी रद्द केली जाईल.

उमेदवारांना दिलेला भरपाईचा वेळ संगणक प्रणालीवर आधारित असल्याने ज्या उमेदवारांनी अर्ज करताना लेखनिकाची सेवा घेणार असल्याचे नमूद केलेले आहे अशा नोंदणीकृत उमेदवारांनाच अतिरिक्त वेळ देण्यात येईल. भरपाईच्या वेळेसाठी नोंदणीकृत नसलेल्या अन्य उमेदवाराना ऐनवेळी अशा सवलतींना परवानगी दिली जाणार नाही.

परीक्षेदरम्यान कोणत्याही टप्यावर लेखनिक स्वतंत्रपणे प्रश्नांची उत्तरे देत असल्याचे आढळल्यास, परीक्षा सत्र समाप्त केले जाईल आणि उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. परीक्षा संपन्न झाल्यानतरही जर परीक्षेदरम्यान लेखनिकाच्या सेवांचा स्वतंत्रपणे प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वापर केल्याचे परीक्षा प्रशासनास आढळून आल्यास अशा उमेदवारांची उमेदवारी देखील रद्द केली जाईल.

अस्थिव्यंग आणि मेंदूचा पक्षाघात असलेल्या उमेदवारांसाठी मार्गदर्शक सुवनाः अस्थिव्यंग आणि मेंदूचा पक्षाघात (किमान ४०% दिव्यागत्व असलेल्या उमेदवारानी आवेदन पत्रामध्ये तसे नमूद केलेले असल्यास त्यांना प्रति तास २० मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाईल.

दृष्टिहीन उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना:- दृष्टिहीन ज्यांना ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व आहे उमेदवार परीक्षेसाठी मॅग्निफाइड फॉन्ट वी सुविधा उपलब्ध करण्याचा पर्याय येऊ शकतात. तसेच अशा उमेदवारांना भरपाई म्हणून दर तासासाठी अतिरिक्त २० मिनिटे देण्यात येतील

सदरची मार्गदर्शक तत्वे केंद्र / महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या सूचनांनुसार / निर्णयानुसार असून त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने बदल केल्यास ते बदल लागू राहतील,

१५. अयोग्य वर्तन / अयोग्य माध्यमांचा वापर केल्याबद्दल दोषी आढळलेल्या उमेदवारांविरुद्ध कारवाई :- उमेदवारांना सूचित केले जाते की त्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना कोणतेही खोटे, छेडछाड केलेले किंवा कोरे

(Nil) सादर करू नयेत आणि कोणतीही महत्त्वाची माहिती लपवू नये परीक्षेच्या वेळी किंवा त्यानंतरच्या निवड प्रक्रियेत उमेदवार खालील बाबतीत दोषी असल्यास किंवा आढळून आल्यास असा उमेदवार त्याविरुद्ध फौजदारी खटला भरणे यासोबतच ज्या परीक्षेसाठी तो उमेदवार आहे त्या परीक्षेसाठी अपात्र ठरविणे, विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी कायमस्वरूपी किंवा

विशिष्ट कालावधीसाठी अपात्र ठरविणे किंवा त्याच्या सेवा समाप्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल,

अयोग्य मार्गाचा अवलंब करणे.

तोतयागिरी करणे किंवा कोणत्याही व्यक्तीद्वारे तोतयागिरी करून घेणे,

परीक्षा हॉलमध्ये गैरवर्तन करणे किंवा चाचणीची सामग्री किंवा त्यातील इतर कोणतीही माहिती कोणत्याही स्वरुपात तोडी किवा लेखी, इलेक्ट्रॉनिक किवा यांत्रिकरित्या कोणत्याही उद्देशाने उघड करणे, प्रकाशित करणे, पुनरुत्पादन करणे, प्रसारित करणे, संग्रहित करणे किंवा प्रसारित करणेसाठी सुलभ करणे, करणे, किंवा

त्याच्या / तिच्या उमेदवारीच्या संदर्भात कोणत्याही अनियमित किंवा अयोग्य मार्गाचा अवलंब

अयोग्य मार्गाने त्याच्या / तिच्या उमेदवारीसाठी समर्थन मिळवणे, किंवा

परीक्षा / मुलाखत हॉलमध्ये मोबाईल फोन किवा संवादाची तत्सम इलेक्ट्रोनिक उपकरणे बाळगणे.

१६. उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-

परीक्षा केंद्राचा पत्ता प्रवेश पत्रावर नमूद करण्यात येईल. परीक्षेचे केंद्र / स्थळ / दिनाक/वेळ बदलाची कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही.

परीक्षा प्रवेशपत्रावर नमुद केलेल्या वेळेनंतर परीक्षा केंद्रावर उपस्थित होणा-या उमेदवारांना परीक्षेला बसु देण्याची परवानगी दिली जाणार नाही. उमेदवाराना परीक्षा केंद्रावरील विहीत प्रक्रिया (उमेदवाराना महत्वाच्या सुचना देणे. उमेदवाराची व कागदपत्राची पडताळणी करणे, आवश्यक कागदपत्र जमा करणे लॉग इन करणे) पार पाडण्यासाठी उमेदवारांनी परीक्षा सुरु होण्यापूर्वी किमान १ तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.

उमेदवाराने अर्जामध्ये नमूद केलेली माहिती कोणल्याही टप्प्यावर चुकीची, अपूर्ण अथवा खोटी आढळून आल्यास उमेदवाराची सबंधित पदासाठीची उमेदवारी रद्द करण्यात येईल व सबधित उमेदवार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. चुकीच्या माहितीच्या आधारे नियुक्ती झाल्यास कोणतीही पूर्व सूचना / नोटीस अथवा कारण न देता उमेदवार तात्काळ सेवेतून काढून टाकण्यास पात्र राहील. त्यामुळे होणा-या सर्व परिणामास उमेदवार स्वतः जवाबदार राहील.

ओळख पटविणे परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्रासह उमेदवाराचे ओळख पटवणारे व उमेदवाराचा अलीकडील फोटो चिकटवलेले वैध फोटो ओळखपत्र जसे पॅन कार्ड/पारपत्र / वाहनचालक परवाना/ मतदार ओळखपत्र / फोटो सहित आधारकार्ड/बँकेचे फोटो सहीतचे पासबुक / महाविद्यालयाचे / विद्यापीठाचे अलीकडील वैध ओळखपत्र / कर्मचारी ओळखपत्र / फोटोसहित असणारे बार कौन्सिलचे ओळखपत्र समवेक्षक/पर्यवेक्षकाला सादर करणे आवश्यक आहे. उमेदवाराची ओळख ही उमेदवाराचे प्रवेशपत्र हजेरीपत्रक / उपस्थितीपत्रक त्याने सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे पटविली जाईल. जर उमेदवाराची ओळख पटवण्याबाबत काही शंका उपस्थित झाल्यास किंवा ओळख शंकास्पद असल्यास त्याला परीक्षेसाठी उपस्थित राहु दिले जाणार नाही.

रेशनकार्ड व तात्पुरता वाहन परवाना परीक्षेसाठी वैध ओळखीचा पुरावा म्हणून स्विकारले जाणार नाही.

टिप :-

मुळ कागदपत्रे, त्या कागदपत्रांच्या छायाकीत प्रती, परीक्षेच्या प्रवेशपत्रासह सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा परीक्षा केंद्रावर

उपरोका परीक्षेला उपस्थित रहाताना उमेदवाराने स्वतःची ओळख पटविण्यासाठीची उपरोक्त नमुदपैकी आवश्यक ते

प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवाराचे परीक्षेच्या प्रवेशपत्रावरील आणि सादर केलेल्या ओळखपत्रावरील नाव आवेदनपत्रात नोंदणी केल्यानुसार ततोतंत जुळणे आवश्यक राहील. ज्या महिला उमेदवारांच्या पहिल्या मधल्या शेवटच्या नावांत विवाहानंतर बदल झाला असल्यास त्यानी याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. सदर महिला उमेदवारानी नावात बदल झाल्याबाबतचे राजपत्र / विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र यापैकी एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे, परीक्षेचे प्रवेशपत्र सार करण्यात आलेले फोटो ओळखपत्र यामधील नावात कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवारास परीक्षेला उपस्थित राहु दिले जाणार नाही. सर्व उमेदवारानी खालील कागदपत्रासह ऑनलाईन परीक्षेला उपस्थित रहाणे आवश्यक आहे. खालीलपैकी कोणतेही कागदपत्र नसल्यास उमेदवारास परीक्षेला उपस्थित राहु दिले जाणार नाही. १. परीक्षेसाठी वैध प्रवेशपत्र

२. मुळ फोटो ओळखपत्र

ऑनलाईन अर्जात भरलेल्या माहितीस उमेदवार स्वतः जवाबदार राहील त्यास विभाग कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.

टीप:-

उमेदवारांना परीक्षेला उपस्थित असताना परीक्षेच्या प्रवेशपत्रासह ओळखपत्राच्या पुराव्याची छायांकित प्रत सादर करावे लागेल, त्याशिवाय त्याना परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. परीक्षार्थी उमेदवारानी लक्षात ठेवावे की प्रवेशपत्रावर दिसणारे नाव नोंदणी प्रक्रीये दरम्यान दिलेले ओळखपत्रावर दिरात असलेल्या नावाशी ततोतत जुळले पाहिजे. विवाहानंतर नाव / आडनाव / मध्यम नाव बदललेल्या महिला उमेदवारांनी याची विशेष नोंद घ्यावी. प्रवेश पत्र आणि ओळखपत्रामध्ये दर्शविलेले नाव यामध्ये साम्य न आढळल्यास उमेदवाराला परीक्षेला बसू दिले जाणार नाही. ज्या उमेदवारांनी त्यांचे नाव बदलले आहे त्यांच्या बाबतीत, त्यानी मूळ राजपत्र अधिसूचना / त्याचे मूळ विवाह प्रमाणपत्र / प्रतिज्ञापत्र मूळ स्वरूपात सादर केले तरच परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाईल.

१७. इतर अटी :-

परीक्षेच्या व्यवस्थापनामध्ये काही समस्या येण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही ज्यामुळे ऑनलाईन चाचणी वितरणावर तसेच निकालावर परिणाम होऊ शकतो. अशावेळी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी

प्रयत्न केले जातील. तथापि यामध्ये उमेदवाराची हालचाल, व परीक्षेला विलंब होणे यासारख्या बाबी गृहीत घरण्यात आलेल्या आहेत. परीक्षेचे फेर आयोजन हे विभागाच्या / परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेच्या पूर्ण निर्णयावर अवलबून राहील. परीक्षेच्या फेर आयोजनासाठी उमेदवारांचा कोणताही दावा राहणार नाही. चाचणी वित्तरणाची विलंबित प्रक्रीया न स्विकारणारे, हालचालीस नकार देणारे किवा अशा प्रक्रियेत सहभागी होण्यास

इच्छुक नसलेले उमेदवार सरसकटपणे निवड प्रक्रियेतून बाद ठरविले जातील. परीक्षेशी संबंधित सर्व बाबींमध्ये विभागाचा निर्णय अंतिम असेल आणि तो उमेदवारावर बंधनकारक असेल. या संदर्भात विभागाद्वारे कोणताही पत्रव्यवहार किवा वैयक्तिक चौकशी केली जाणार नाही.

१७ ३

परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये घेतल्यास, विविध सत्रामधील वापरल्या जाणाऱ्या चाचणीमधील काठिण्य पातळी विचारात घेऊन विविध सत्रांमधील गुण समायोजित करून समतुल्य करण्यात येतील. परीक्षा केंद्राची / परीक्षा केंद्रावरील नोडची (Node) क्षमता कमी असल्यास किंवा कोणत्याही केंद्रावर किंवा कोणत्याही उमेदवारासाठी

काही तांत्रिक व्यत्यय आल्यास अशा केंद्रावर एकापेक्षा जास्त सत्रे आयोजीत केली जाऊ शकतात.

१७

विभाग उमेदवाराच्या वैयक्तिक प्रतिसादाचे (उत्तरे) विश्लेषण इतर उमेदवारांच्या प्रतीसादाशी अचूक आणि चुकीच्या उत्तरांच्या समानतेचे नमुने शोधण्यासाठी करेल. यासंदर्भात विभागाद्वारे अवलंबलेल्या विश्लेषणात्मक प्रक्रियेत, उमेदवारानी उत्तरे एकमेकासोबत वाटप (share) केलेली आहेत आणि त्याना मिळालेले गुण खरे / वैध नाहीत असा निष्कर्ष निघाल्यास विभाग अशा उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवते तसेच अशा उमेदवाराचे निकाल रोखले जातील.

१७

निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर उमेदवाराने चुकीची माहिती दिल्याचे किंवा उमेदवाराकडून निवड प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास उमेदवार निवड प्रक्रियेतून अपात्र ठरेल आणि त्याला / तिला यापुढे कोणत्याही निवड प्रक्रियेमध्ये भाग घेण्यास प्रतिबंध करण्यात येईल.

१८. गुण

पद्धती :- खालील पद्धतीचा अवलंब करून ऑनलाईन परीक्षेचे गुण ठरविले जातात:-

१८ १

वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये प्रत्येक उमेदवाराने अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नाची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात जातील

१८ २

परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेण्यात आलेली असल्यास वरीलप्रमाणे उमेदवाराने संपादित केलेले अंतिम गुण विविध सत्रामधील वापरल्या जाणाऱ्या चाचणीमधील काठिण्य पातळी विचारात घेऊन विविध सत्रामधील गुण समायोजित करून समतुल्य करण्यात येतील.

१९. निवडीचे निकष :

जाहिरातीत नमूद विविध पदावरील नियुक्त्या या सदरच्या परीक्षेच्या आधारे उमेदवाराने प्राप्त केलेल्या गुणाकनाच्या

यादीच्या आधारे निवड करून करण्यात येतील. परीक्षेद्वारे निवडीसाठी आवश्यक किमान गुण प्राप्त करणे बंधनकारक राहील.

एकापेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण मिळाल्यास गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग के

प्राणि १२२२/प्र.क्र.५४/का. १३-अ, दिनांक ४ मे, २०१२ मधील तरतुदीनुसार राहील.

२०. उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी संबंधीत नियुक्ती प्राधिकारी यांचेकडे सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांचा तपशील.

२०.१ परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत.

२०.२ शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे

२०.३ संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

२०.४ परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत.

२०.५ अर्जात नमूद केलेंप्रमाणे जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र / नॉन क्रीमीलेअर/ इतर आवश्यक प्रमाणपत्र

२१. सेवाप्रवेशोत्तर शर्ती:-

१ ज्या पदांकरिता प्रचलित नियमानुसार विभागीय / व्यावसायिक परीक्षा विहीत केली असेल अथवा आवश्यक असेल तेथे त्यासबंधी केलेल्या नियमानुसार विभागीय / व्यावसायिक परीक्षा देणे बंधनकारक राहील.

२ हिंदी आणि मराठी भाषा परीक्षेसवधी केलेल्या नियमानुसार जर ती व्यक्ती अगोदर परीक्षा उत्तीर्ण झाली नसेल किंवा तिला उत्तीर्ण होण्यातून सूट मिळाली नसेल तर ती परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. ३

संगणकाच्या ज्ञानासंदर्भात शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र.६१/२००१/३९ दिनांक १९ मार्च, २००३ तसेच शासन निर्णय माहीती तंत्रज्ञान विभाग (सा.प्र.वि) विभाग क्रमांक मास २०१२/प्र.क्र.२७७/३९ दिनांक ४ फेब्रुवारी २०१३ नुसार संगणक अर्हता प्राप्त करणे आवश्यक आहे.

२२. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज में मरतांना काही अडचण आल्यास उमेदवारानी https://ogrs.bps.in/ या ि लिंक वर व arti

खालील हेल्पलाईन वर संपर्क साधावा.

Helpline numbers are as below.

१८०० १०३ ४५६६ २३. सदर जाहिरात https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे व ऑनलाईन अर्ज करण्याकरीता

https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

उपलब्ध करुन दिलेली आहे.

स्वाक्षरीत/-

नयना गुंडे भा.प्र.से

आयुक्त, आदिवासी विकास,

महाराष्ट्र राज्य, नाशिक

स्थळ :- नाशिक

दिनांक २३ नोव्हेंबर २०२३

 

 

आदिवासी विकास विभाग योजना


आदिवासी विकास विभागतील शिक्षण विषयक  योजना

·         शासकीय आश्रमशाळा

·         वसतिगृहे

·         क्रीडा सुविधा

·         पुरक पोषण कार्यक्रम

·         शिष्यवृत्ती

·         अनुदान

·         कौशल्य विकास कार्यक्रम

आदिवासी विकास विभागतील रोजगार विषयक  योजना

·         रोजगार हमी योजना

·         स्वयंरोजगार योजना

·         लघु उद्योग विकास योजना

·         कौशल्य विकास कार्यक्रम

आदिवासी विकास विभागतील आरोग्य विषयक  योजना

·         आरोग्य सेवा केंद्रे

·         दवाखाने

·         रुग्णालये

·         औषधोपचार योजना

·         आरोग्य शिबिरे

आदिवासी विकास विभागतील पाणीपुरवठा विषयक  योजना

·         नळपाणी योजना

·         विहिरी

·         बोअरवेल

·         पाणीपुरवठा योजना

आदिवासी विकास विभागतील शेती  विषयक  योजना

·         शेती विकास योजना

·         कृषी यांत्रिकीकरण योजना

·         पीक विमा योजना

·         शेतमाल खरेदी योजना

आदिवासी विकास विभागतील ग्रामीण विकास विषयक  योजना

·         ग्रामीण पायाभूत सुविधा विकास योजना

·         गावांमध्ये वीज

·         रस्ते

·         टेलिफोन

·         इंटरनेट सेवा

आदिवासी विकास विभागतील  सामाजिक आणि सांस्कृतिक विकास विषयक  योजना

·         आदिवासी संस्कृतीचे संवर्धन

·         आदिवासी कला आणि हस्तकला विकास

·         आदिवासी भाषांचे संवर्धन

या योजनांव्यतिरिक्त, आदिवासी विकास विभागाद्वारे विविध प्रकारच्या मुक्त निधी योजना देखील राबविल्या जातात. या योजनांमध्ये आदिवासींच्या विविध गरजांवर लक्ष केंद्रित केले जाते. जाऊन त्यांना आर्थिक सह्हाय देखील केले.

आदिवासी विकास विभागतील  मुक्त निधी योजना विषयक  योजना

·         आदिवासींच्या घरांचे बांधकाम

·         आदिवासींच्या शेतीसाठी शेती यंत्रणा

·         आदिवासींच्या व्यवसायासाठी कर्ज

·         आदिवासींच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत

·         आदिवासींच्या आरोग्यासाठी मदत

·         आदिवासींच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी मदत

या योजनांमुळे आदिवासींच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. आदिवासींच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे तसेच त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत असून, त्यांच्या शिक्षणाच्या संधी वाढल्या गेल्या मुळे त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला प्रोत्साहन मिळाले आहे.

 


Post a Comment

0 Comments

Top Post Ad | MahaNokri

Below Post Ad | MahaNokri