Color Posts

Type Here to Get Search Results !

WhatsApp वर पाठवा

(Solar Krushi Pump ) सौर कृषीपंपांसाठी प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

0

(Solar Krushi Pump ) सौर कृषीपंपांसाठी प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन




मुंबई, दि. 13 : केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.  प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. (Reference: mahasamvad.in )


थोडक्यात महत्वाचे 

उपलब्ध पंप

3 HP

5 HP

7.5 HP

अनुदान

खुला वर्ग ९० % अनुदान.

अनुसूचित जाती व जमाती ९५ % अनुदान.

कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • जातीचा दाखला
  • सातबारा(२०२१ चा असावा)
  • बँक पासबुक
  • मोबाईल क्रमांक

अट व पात्रता

  • ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे
  • प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल





Post a Comment

0 Comments

Mahaenokari.com

mahaenokari.com